34.6 C
Latur
Monday, March 31, 2025
Homeमहाराष्ट्रगोशाळांच्या बँक खात्यात २५ कोटींचे अनुदान

गोशाळांच्या बँक खात्यात २५ कोटींचे अनुदान

मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ५६० गोशाळांना ऑनलाईन वितरण

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील ५६० गोशाळांच्या बँक खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेचे २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात आले. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे ३ महिन्यांचे हे अनुदान आहे. गोशाळांमध्ये ठेवण्यात येणा-या देशी गायींच्या पालनपोषणासाठी प्रति दिन प्रति गाय रु. ५०/- अनुदान योजनेंतर्गत राज्यातील ५६० गोशाळांमधील ५६ हजार ५६९ गायींसाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटी ४५ लाख ६० हजार ५०० रुपये इतके अनुदान महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत लाभार्थी गोशाळांना वितरित करण्यात आले.

महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या या कार्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य गोसेवा आयोगाचे अभिनंदन केले. देशी गोवंश संवर्धन ही काळाची गरज असून, देशी गोवंशाच्या संवर्धनामुळे ग्रामीण विभागाचा विकास गतिमान होण्यास मदत होणार आहे. राज्यातील अधिकाधिक गोशाळांना या योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष, सदस्य, अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ऑनलाईन अनुदान वितरण प्रसंगी आयोगाचे अध्यक्ष मुंदडा, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य आदी उपस्थित होते.

पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आयोगाच्या या कार्याला शुभेच्छा दिल्या असून, देशी गोवंशसंवर्धनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या माध्यमातून देशी गोवंश संवर्धनाचे सुरू असलेले काम उल्लेखनीय आहे. यामुळे देशी गोवंश संरक्षण आणि संवर्धन होणार असल्याचे, म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR