पुणे : गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आणि गर्दी हे समीकरणच झाले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गौतमी पाटील हिचे कार्यक्रम झाले आहेत. शहरांमध्ये नव्हे तर ग्रामीण भागातही कार्यक्रम होत आहेत. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना होणा-या प्रचंड गर्दीमुळे बंदोबस्त लावून कार्यक्रम घेतले जात आहेत. आतापर्यंत सार्वजनिक कार्यक्रम, वाढदिवसानिमित्तही गौतमी पाटील हिला बोलावले जात आहे. मात्र आता गौतमी पाटील प्रथमच क्रिकेटच्या मैदानात थिरकली आहे. क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये तिने भन्नाट नृत्य केले आहे. पुणे जिल्ह्यात तिचा हा कार्यक्रम झाला आहे.
गौतमी पाटील चक्क क्रिकेटच्या मैदानात थिरकली आहे. यापूर्वी गौतमी पाटील वाढदिवस, लग्नाचे रिसेप्शन यासारख्या कार्यक्रमात नृत्य करताना दिसली. मात्र पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे क्रिकेटच्या मैदानावर गौतमी पाटील आली. तिने शिरूर प्रीमियर लीगमधील सामन्यांत नृत्य केले. या क्रिकेट प्रीमियर लीगच्या फायनल सामन्याच्या शेवटच्या दिवशी गौतमी पाटील हिला बोलवण्यात आले. यावेळी व्यासपीठावर तिने नृत्य केले. यावेळी प्रेक्षकांना क्रिकेटसोबत गौतमी पाटील हिच्या नृत्याचा आनंद मिळाला. गौतमी पाटील हिने प्रथमच एखाद्या क्रिकेट सामन्याच्या वेळी नृत्य केले. तिच्या या कार्यक्रमामुळे क्रिकेट आणि नृत्य असे दोन्ही आनंद प्रेक्षकांना मिळाले.
गौतमी पाटील हिचा क्रिकेट सामन्याच्या लीगमध्ये नृत्य करतानाचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर या व्हीडीओवर अनेक प्रकारच्या कॉमेंट येत आहेत. क्रिकेट लीगमध्ये गौतमी पाटील हिला बोलवण्याची कल्पना अनेक नेटक-यांना आवडली आहे.