28 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeमहाराष्ट्रग्रँट रोड परिसरात इमारत कोसळली; १ ठार

ग्रँट रोड परिसरात इमारत कोसळली; १ ठार

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील एका इमारतीचा स्लॅब कोसळण्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर काही जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ग्रँट रोड परिसरातील शालीमार हॉटेलजवळील युनायटेड चेंबर्समधील एका गृहसंकुलात आज (३ ऑक्टोबर) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली.

अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत इमारतीच्या दुस-या आणि चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळले. या घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलिस, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक आणि रुग्णवाहिका यांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. सागर निकम असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

ग्रँट रोडवरील मौलाना शौकत अली रोडवरील भारत नगरसमोर शालीमार हॉटेलजवळील युनायटेड चेंबर्समध्ये असलेली ही इमारत कोसळली आहे. प्राथमिक अहवालात जखमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR