निलंगा : प्रतिनिधी
केवळ मार्क मिळवून जीवनात यश मिळवता येत नाही त्यासाठी संस्कारक्षम पिढी घडणे गरजेचे आहे. कॉपीमुक्त परीक्षा होणे महत्त्वाचे असून ग्रामीण भागात गुणवंत विद्यार्थ्यांची खाण आहे, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी केले.
निलंगा येथे मराठा सेवा संघप्रणित जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद आयोजित गुणवंत सोहळा व करिअर मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिवपिठावर मुख्याधिकारी गजानन शिंंदे, गटशिक्षणाधिकारी एस. बी. गायकवाड, अपोलो हॉस्पिटलचे डॉ. मनोज कदम, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता भागवत थेटे, मराठा समाज विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उदय पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष एम. एम. जाधव, डी. बी. बरमदे, समाधानताई माने, ज्ञानेश्वर जाधव, बालाजी जाधव, विनोद सोनवणे आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्याधिकारी गजानन शिंंदे बोलताना म्हणाले की, सोशल मीडियामुळे विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होत असून शिक्षक प्राध्यापक व पालकांनी मोबाईल व सोशल मीडियापासून विद्यार्थ्यांना दूर करण्यात यश मिळवले तर निश्चीतच विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल होईल. यावेळी दहावी, बारावी परिक्षेत उज्ज्वल यश मिळविलेल्या गुणवंताचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात एकूण १०० गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
अमरदीप पाटील यांनी जिजाऊ वंदना हे गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत पाचंगे यांनी तर सूत्रसंचलन प्रा सतीश हानेगावे तर आभार अमरदिप पाटील यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर के निलवाडे, मोहन घोरपडे, प्रमोद कदम, प्रदीप कदम, डी एन बरमदे, अजय मोरे, एडवोकेट तिरुपती शिंदे, संदीप खमीतकर, प्रताप हंगरगे, लक्ष्मण काळे, अर्चना मोरे, भाग्यश्री बिराजदार, वैशाली इंगळे, उर्मिला माने, प्रकाश सगरे आदींनी परिश्रम घेतले.