बार्शी-
विविध मागण्यांसाठी बार्शीतील घंटागाडी कर्मचारी आणि महिला सफाई कर्मचाऱ्यांनी पुकारलेले कामबंद आंदोलन मागणी मान्य केल्याने मागे घेण्यात आले.
सफाई कामाचा ठेका घेतलेल्या कंपनीला नगरपालिकेने कामाचे बिल न दिल्याने एप्रिल व मे महिन्याचा पगार न केल्याने तसेच २०१२ ते २०१६ या काळात सुमित फॅसिलिटिज, २०१६ ते २०२२ या काळात बीव्हीजी ग्रुपने स्वच्छतेचा ठेका घेतला. या काळातील हजेरी रजिस्टर तसेच दरमहा महिला सफाईकामगारांना किमान २६ दिवस काम मिळावे या मागणीसाठी नगरपरिषदेसमोर ठेकेदार कर्मचाऱ्यांनी उपोषण केले.
या आंदोलनाला मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण व आरोग्य विभाग प्रमुख शब्बीर वस्ताद यांनी भेट देऊन मागणीप्रमाणे तत्काळ कारवाई करण्याचे अभिवचन दिले. यानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी अतुल पेटाडे, मक्रोज बोकेफोडे, मनीज गवळी, रामेश्वर पालखे, रोहित बगाडे, विद्या कदम, दीपाली कांबळे, उज्ज्वला बोकेफोडे, सुरेखा शिंदे, सुनंदा चव्हाण आदी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.