घरगुती उपकरणांवर रेटिंग बंधनकारक; केंद्राचा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
१ जानेवारीपासून रेफ्रिजरेटर (फ्रिज), टेलिव्हिजन (टीव्ही), एलपीजी गॅस शेगडी आणि कूलिंग टॉवर यांसारख्या घरगुती उपकरणांवर ऊर्जा कार्यक्षमतेचे ‘स्टार रेटिंग’ असणे आता अनिवार्य करण्यात आले आहे.

वाढती वीज टंचाई आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. ऊर्जा मंत्रालयांतर्गत येणा-या ‘ऊर्जा दक्षता ब्युरो’ने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. या नवीन नियमांमुळे आता केवळ टीव्ही-फ्रिजच नव्हे, तर डीप फ्रीझर, वितरण ट्रान्सफॉर्मर आणि ग्रिडला जोडलेले सोलर इन्व्हर्टर यांवरही स्टार रेटिंग असणे बंधनकारक असेल. रूम एअर कंडिशनर (एसी), इलेक्ट्रिक सीलिंग फॅन, वॉटर हिटर, वॉशिंग मशीन आणि एलईडी लॅम्पसाठीचे ऊर्जा कार्यक्षमतेचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.

या उपकरणांच्या स्टार रेटिंगसाठी जुलै २०२५ मध्ये नियमावलीचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यावर नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. या सूचनांचा अभ्यास करूनच आता नवीन बदल लागू करण्यात येत आहेत.

ग्राहकांना काय फायदा?
स्टार रेटिंग असलेली उपकरणे खरेदी केल्यामुळे घराचे वीजबिल कमी होण्यास मदत होईल. स्टार रेटिंगमुळे ग्राहकांना उपकरणाच्या कार्यक्षमतेची अधिकृत माहिती मिळेल, ज्यामुळे फसवणूक टळेल. एलपीजी गॅस शेगडीवर स्टार रेटिंग आल्यामुळे गॅसचीही बचत होणार आहे. उपकरणावर जितके जास्त स्टार्स (१ ते ५), तितकी त्या उपकरणाची वीज किंवा इंधन वापरण्याची क्षमता कमी आणि बचत जास्त असेल.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
02:39:31
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news