22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरघरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगाराला अटक 

घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगाराला अटक 

लातूर : प्रतिनिधी
घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगाराला २ लाख २५ हजार रुपयांच्या सोन्याचे ९० ग्राम वजनाचे दागिन्याच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. घरफोडीचे ३ गुन्हे, व पोलिसावर चाकू हल्ला केल्याचा एक गुन्हा उघडकीस आला आहे.
जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस स्टेशनला घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेशित केले होते. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथके तयार करुन त्यांना सखोल मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या होत्या. घरफोडीतील व पोलिसांवर चाकू हल्ला केलेला कुख्यात गुन्हेगार त्याने चोरलेला सोन्याचा मुद्देमाल विकण्यासाठी निलंगा तालुक्यातील  हाडगा ते निलंगा जाणा-या रोडच्या परिसरात फिरत आहे, अशी माहिती मिळाली. सदर माहितीची खातरजमा करुन सदरचे पथक तात्काळ रवाना करण्यात आले. दि. ५ मार्च रोजी सदर पथकाने निलंगा येथे पोहोचून हाडगा ते निलंगा जाणा-या परिसरात फिरत असलेल्या नामदेव किशन भोसले वय २४ वर्षे रा. मंग्याळतांडा, तालुका मुखेड जिल्हा नांदेड या संशयित आरोपीला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे असलेल्या पिशवीमध्ये सोन्याचे वेगवेगळे दागिने दिसून आले. त्याबाबत त्याच्याकडे विचारले तेव्हा त्याने त्याच्या इतर आणखीन दोन साथीदारासह मिळून लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडीचे गुन्हे केल्याचे व त्या गुन्ह्यामध्ये चोरलेला, त्याच्या वाट्याला आलेले सोन्याचा दागिन्याचा मुद्देमाल व रोख रक्कम असल्याचे कबूल केले. लातूर जिल्ह्यात घडलेल्या घोरफोडीच्या गुन्ह्याच्या अभिलेखाची पाहणी केली असता नमूद आरोपीनी पोलीस ठाणे कासार शिरशी, औसा, किल्लारी येथील एकूण तीन घरफोडी चे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. तसेच पोलीस ठाणे निलंगा येथे चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना निलंगा पोलिसांनी नमूद आरोपींना ताब्यात घेत असताना पोलिसावर चाकू हल्ला करुन पळून गेला होता. आरोपीस त्याने इतर साथीदाराच्या सोबत चोरलेल्या ९० ग्राम सोन्याचे दागिने २ लाख २५ हजार रुपयाच्या मुद्देमालासह पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे कासारशिरशी यांचे ताब्यात देण्यात आले आहे. असून त्याच्या सोबत असलेल्या फरार आरोपी साथीदाराचा शोध सुरु आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR