22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरघरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस मुद्देमालासह अटक

घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस मुद्देमालासह अटक

लातूर :  प्रतिनिधी
पोलीस ठाणे औसा हद्दीमध्ये राहत्या घराचा कडी-कोयंडा तोडून  स्कुटी, मोबाईल, सोन्याचे झुमके व नगदी रक्कम चोरल्याची घटना घडली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात औसा पोलिसांनी सदरील घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला मुद्देमालासह अटक करण्याची कारवाई केली आहे. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेशित केले होते. त्यावरून पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, औसा उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनात औसा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वात औसा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून त्यांना सखोल मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या होत्या.
सदर पथकाकडून गुन्ह्यासंदर्भात बारकाईने तपास सुरू असताना बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून अज्ञात आरोपीचा शोध घेण्यात येत होता. पथकाला गुप्त बातमीदाराकडून घरफोडीचे गुन्हे करणा-या आरोपीची माहिती मिळाली. सदर माहितीची बारकाईने अभ्यास व विश्लेषण करून घरासमोर लावलेली स्कुटी गाडी, घरातील रोख रक्कम, मोबाईल व सोन्याचे दागिने चोरी करणा-या आरोपीला निष्पन्न करून त्यांच्या राहते ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर पथकांनी अतिशय कुशलतेने व उत्कृष्टपणे नमूद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन आरोपी नामे साहिल महबूब सय्यद, वय २२ वर्ष, राहणार टेंभी, तालुका औसा याला दि. १ फेब्रुवारी रोजी त्याच्या राहत्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याने वर नमूद गुन्ह्यात चोरलेल्या मुद्देमालापैकी एक स्कुटी गाडी, मोबाईल असा मुद्देमाल हजर केल्याने नमूद आरोपीला अटक करण्यात आलेली आहे तसेच आरोपीकडे आणखीन विचारपूस केली असता त्याने पोलिस ठाणे विवेकानंद चौक हद्दीतून एका मोबाईलची चोरी केली असून त्या संदर्भात पोलिस ठाणे विवेकानंद चौक येथे गुन्हा दाखल आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR