औसा : प्रतिनिधी
छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे-पाटील आणि इतरांना रविवारी लातुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यानी बेदम मारहाण केल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, काँग्रेस, छावा संघटना, संभाजी ब्रिगेड, मनसे संघटना, शेतकरी संघटना, अशा विविध संघटनाच्या माध्यमातून औशात कडकडीत बंद पाळण्यात आला.
अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील व त्यांच्या सहका-यांवर २० जुलै रोजी लातूर येथील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष सुरेश चव्हाण व त्यांच्या सहका-यांनी जबर मारहाण करून जखमी केले. याच्या निषेधार्थ मंगळवारी २२ जुलै रोजी औसा येथील किल्ला मैदानापासून मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चामध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते गणपतराव बाजूळगे, सचिन पाटील, अमर खानापूरे, शिवकुमार नागराळे, सुरेश भुरे, भरत सूर्यवंशी, दत्तोपंत सूर्यवंशी, संजय उजळंबे, नागेश मुगळे, गोविंद खंडागळे, खुनमीर मुल्ला, जयराज कसबे, राजेंद्र मोरे, राजू कसबे, धर्मराज पवार,आबासाहेब पवार, शेख सन्नाउल्ला सचिन पवार, संपत गायकवाड, गणेश गायकवाड, बाबा मुगळे, भागवत साळुंके यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे त्याचबरोबर काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, संभाजी ब्रिगेड, छावा संघटनेचे सर्व आजी-माजी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.