घाडगे हल्ला प्रकरणी प्राणघातक हल्ल्याचे कलम वाढवा

लातूर : प्रतिनिधी
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांच्यावरील झालेला हल्ला हा प्राणघातक असून या घटनेचा मुख्य सूत्रधार राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे असल्यामुळे कलमात वाढ करावी आणि सुनील तटकरे यांना आरोपी करावे, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे  यांच्याकडे करण्यात आली आहे.
विजयकुमार घाडगे यांनी सुनील तटकरे यांना दिलेले निवेदन हे लोकशाही मार्गाने होते, असे असताना सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच आणि त्यांनी रचलेल्या कटाप्रमाणे प्रदेशाध्यक्षाचा अपमान झाल्याचा राग मनात धरून विजयकुमार घाडगे यांना जिवे मारावे याच मुख्य उद्देशाने सुरज चव्हाण व त्यांच्या साथीदारांनी विश्रामगृहात फायटर, लोखंडी कडे याचा वापर करून, तसेच कोपराने घाडगे यांच्या मानेवर जबर मारहाण केली. त्यांच्या चेह-यावर आणि डोळ्यावर सुद्धा जबर मारहाण
केली.
मानेचा भाग हा शरीराचा नाजूक भाग असतो आणि त्यावरच केलेली मारहाण म्हणजे विजयकुमार घाडगे यांना जिवे मारण्याचा प्रयत्न होता म्हणून विवेकानंद पोलीस स्टेशन येथील दाखल केलेल्या गुनह्यातील कलमे अपुरी आहेत. म्हणून विजयकुमार घाडगे यांचा पुरवणी जवाब घेण्यात यावा आणि जिवे मारण्याचा प्रयत्न कलम १०९ आणि कट रचने कलम ६१ वाढवण्यात यावे, तसेच सुनील तटकरे यांना आरोपी करावे, अशी आग्रही मागणी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्याकडे केली असता शिष्टमंडळाला निवेदनाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करण्याबाबत पोलिस अधीक्षक यांनी अश्वस्त केले.
या शिष्टमंडळात प्रामुख्याने अ‍ॅड. उदय गवारे, नेहरू देशमुख, हंसराज जाधव, डी. एस. पाटील, अ‍ॅड.  शेख जैनु, अ‍ॅड. चंद्रकांत मेटे, डॉ. अमित पाटील, नानासाहेब जाधव, अ‍ॅड. देविदास बोरुळे, अ‍ॅड. भालचंद्र पाटील, दत्ता टेकाळे, अ‍ॅड. योगेश शिंदे, अ‍ॅड.  ए. व्ही. चव्हाण, सचिन दाणे, सतीश कारंडे, अ‍ॅड.  हरी निटुरे, वैजनाथ जाधव आदी उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

सेविका, मदतनिस होणार बडतर्फ 

लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा संप...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
साकोळ येथे बकरी ईदनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन; मुस्लीम बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
05:42
Video thumbnail
‘हिल हिल पोरी हिला’ वर डॅनी पंडित आणि धनश्री वर्माचा धमाका! पाहा भन्नाट डान्स रील.
00:58
Video thumbnail
नांदेडमध्ये काँग्रेसचा इंधन दरवाढीविरोधात हल्लाबोल;बैलगाडीतून दुचाकी नेत काँग्रेसचं अनोखं आंदोलन
02:09
Video thumbnail
Himayatnagar|नगराध्यक्ष उतरले थेट श्रमदानात!;हिमायतनगरच्या पाणीप्रश्नावर तोडगा
01:37
Video thumbnail
Latur\खंडापूर सप्ताहातील दानरक्कम घेऊन महाराज गायब?;“किशोर महाराजांना अटक करा” ; वारकऱ्यांचा आक्रोश
02:52
Video thumbnail
Latur|लातुरात शिवसेनेचा शक्तिप्रदर्शन मेळावा; २५ हजार कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
07:20
Video thumbnail
घरच्या घरी श्रद्धा कपूरचा फ्री-स्टाईल डान्स; 'त्या' एका टॅगमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण!
00:43
Video thumbnail
समृद्धी महामार्गावर ईव्ही कारला भीषण आग; काही मिनिटांतच गाडी जळून खाक.
00:30
Video thumbnail
Latur|गावठी पिस्तुलासह आरोपी अटकेत!;MIDC पोलिसांची धडक कारवाई
02:16
Video thumbnail
Latur|आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते नूतन शराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष पदग्रहण सोहळा संपन्न.
06:06
Video thumbnail
REEL STAR|रील्स बनवणारी तरुणी निघाली चोर?एलसीबीची मोठी कारवाई
02:19
Video thumbnail
BIG BREAKING|खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याचा अपघात;चार गाड्या एकमेकांवर आदळल्या
00:58
Video thumbnail
Latur|NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची आणखी एक मोठी कारवाई;शिवराज मोटेगावकर यांचे बँक लॉकर सील
03:00
Video thumbnail
nanded|आमदार चिखलीकरांनी मध्यरात्री घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट
04:20
Video thumbnail
Nanded|श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय: नांदेडमध्ये शिवसैनिकांची गर्दी!
03:40

Latest news