चंद्रपूर- चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा धानोरकर यांचा मोठा विजय झाला आहे. त्यांनी भाजपचे दिग्गज सुधीर मुनगंटीवार यांच्यावर १ लाखांपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजय मिळवलाय. या मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल अनेक अर्थाने महत्त्वाचा होता. या मतदारसंघातून भाजपने वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मैदानात उतरवलं होतं, तर काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर या मैदानात होत्या.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला राज्यात फक्त चंद्रपूरमध्ये जागा राखता आली होती. या जागेवर काँग्रेसचे बाळू धानोरकर विजयी झाले होते. पण, त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना २०२४ साठी तिकीट देण्यात आले. त्यांनी देखील चंद्रपूर काँग्रेसकडेच राखला आहे.