लातूर : लातूर-बार्शी रोडवर अंकोली पाटी येथे एका दुचाकीस्वाराला चक्कर आली म्हणून तो रस्त्याच्या कडेला गाडी लावून थांबला असता कोणीतरी चोरट्याने त्याची सुमारे ७४ हजार रूपये किंमतीची मोटारसायकल चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे.
बालाजी बळीराम घोडके रा. जय भवानी हॉटेल बोरगाव – काळे यास मोटारसायकलीवरून जात असताना अंकोली पाटी येथे चक्कर आली म्हणून तो रस्त्याच्या कडेला थांबला असता चोरट्याने त्याच्या जवळील एम.एच. २४-बीएस-४३०९ क्रमांकाची मोटारसायकल अज्ञातांनी चोरून नेली. या प्रकरणी गातेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.