लातूर : प्रतिनिधी
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने ५ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान चक्रवर्ती सम्राट अशोक मौर्य यांच्या जयंती निमित्त लातूर येथील डॉ. आंबेडकर पार्क येथे अभिवादन करण्यात आले.
यावेळी भिखू पय्यानंद, भिखू बोधिराज व भिखू बोधीशील, डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार चिकटे, सचिव राहुल कांबळे यांनी सम्राट अशोक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पंचशील धम्म ध्वजारोहन भिखू पयानंद यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा आशाताई चिकटे, समता सैनिक दलाचे राजाराम साबळे, ब्लु पॅन्थरचे साधूभाऊ गायकवाड, डी. एस. नरसिंगे, विलास आल्टे, मिलिंद धावारे, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, महाविहार धम्म सेवक ग्रुपचे सर्व सदस्य, माता भीमाई शाक्य संघ, सेवा निवृत्त पोलीस कर्मचारी व अधिकारी संघटनेचे पदाधिकारी, सेवा निवृत्त शिक्षक संघटनेचे कार्यकर्ते आदिसह बौद्ध व बहुजन समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.