चाकुर तालुक्यात जुन, जुलै आणि ऑगस्ट तीन महिन्यांत २६६.४ मि. मी. तर सप्टेंबरमध्ये पाऊस अल्प स्वरूपात पडला आहे. तालुक्यातील विविध गावांतून १५ अधिग्रहानाचे १५ प्रस्ताव आले होते. त्यापैकी १२ प्रस्ताव मंजूर झाले असून उर्वरित तीन प्रस्ताव मंजूरासाठी पाठविण्यात आले आहेत. झरी बु. गावात २ अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर, गांजूरवाडी १ अधिग्रहण, झरी बु. २ अधिग्रहण,गांजूरवाडी १ अधिग्रहण, नांदगाव १ अधिग्रहण, वडवळ ना.३ अधिग्रहण, मोहदळ १ अधिग्रहण, सेवापुर तांडा (आष्टा) १ अधिग्रहण, आंबुलगा १ अधिग्रहण, नागेशवाडी १ अधिग्रहण, आजनसोंडा बु १ अधिग्रहण, केंद्रेवाडी १ अधिग्रहण, आंबेवाडी (कबनसांगवी) १ अधिग्रहण, कडमुळी १ अधिग्रहण करण्यात आले आहे.
















