चाकूर : प्रतिंिनधी
चाकूर नगरपंचायतचे नगर अध्यक्ष कपील गोविंदराव माकणे यांना उमरगा-धाराशीव वीरशैव समाजाच्या वतीने मानाचा बसवरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. लिंगायत समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणा-या समाजबांधवांना या पुरस्काराने सन्मानीत केले जाते. चाकूर नगरीच्या नगरध्यक्ष पदावर ते कार्यरत असून एक युवा अध्यक्ष म्हणून त्यांनी वेगळी छाप निर्माण केली आहे. आपल्या कुटुंबाच्या व्यवसायतून शेकडो लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. चाकूर शहरातील वंचीत, दुबळे, निराधार लोकांना दोन वेळच मोफत जेवनाची सुरवात केली आहे.
दि. १ जानेवारी रोजी उमरगा येथे उजैन पिठाचे जगदगुरु सिध्दलिंगराज शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर, आ. विजयकुमार देशमुख, आ. ज्ञानराज चौगुले, आ. शरणू सलगर, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. चंद्रशेखर पाटील यांच्या उपस्थित उमरगा येथे संपन्न होणार आहे.