चाकूरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा फज्जा; बस ढकलण्याची वेळ

चाकूर : प्रतिनिधी
चाकूर बसस्थानकातून बाहेर पडल्यानंतर शिवाई बस दुभाजकात अडकल्यानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी आणि प्रवाशांनी धाव घेत बसला ढकलून खड्ड्याबाहेर काढले. ही घटना बुधवारी दुपारी घडली असून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या दर्जाबरोबरच कंत्राटदाराच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
चाकूर शहरातून जाणा-या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या संथगतीचा फटका आता थेट वाहतुकीला बसत आहे.राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजकाचे गेल्या अनेक महिन्यांपासून काम सुरू आहे. खोदलेल्या भागात माती भरून रस्त्याची लेव्हल करण्यात आली असली तरी संबंधित ठिकाणी मातीची दबई व्यवस्थित झाली नसल्याने बुधवारी बसस्थानकातून बाहेर पडताच शिवाई बस दुभाजकाच्या मध्यभागी अडकल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. अखेर तेथे उपस्थित नागरिकांनी बसला धक्का देत बाहेर काढले. सार्वजनिक वाहतुकीची बस नागरिकांना ढकलावी लागणे यातून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा निष्काळजीपणा समोर आला.
राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला अपेक्षित गती नसल्याने शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. दुभाजकाचे काम अनेक महिन्यांपासून सुरू असून, कामाच्या ठिकाणी योग्य नियोजन, सुरक्षित वाहतूक व्यवस्था आणि बांधकामातील गुणवत्ता याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काम नेमके कधी पूर्ण होणार, याचे उत्तर संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदाराकडून मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. कामाच्या संथगतीमुळे व्यापारी, वाहनधारक, प्रवासी तसेच शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कामात वारंवार अडथळे निर्माण होत असतानाही संबंधित कंत्राटदारावर ठोस कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे काम दर्जेदार, सुरक्षित आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.  रस्ता विकासासाठी असलेले कामच नागरिकांच्या त्रासाचे कारण ठरू लागले असेल तर या कामाच्या गुणवत्तेची आणि विलंबाची जबाबदारी निश्चीत कोणाची? हा प्रश्न सध्या चाकूरवासीयासमोर पडला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातुरात झाडातून अवतरले गणराय; अनोख्या देखाव्याने वेधलं लक्ष!
04:37
Video thumbnail
🔴 LIVE - एकमत कार्यालयातील गणरायाची आरती |EKMAT DIGITAL
12:45
Video thumbnail
Latur| डुप्लिकेट आमदारांना सांभाळू नका; देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावर अभय साळुंके थेट बोलले
08:03
Video thumbnail
Latur|लातूर-तुळजापूर महामार्गावर राष्ट्रवादीचा रास्ता रोको
03:13
Video thumbnail
Latur|नानिकभाई जोधवानी यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील गणरायाची आरती संपन्न
05:07
Video thumbnail
Latur|मोईजभाई शेख यांच्या आठवणींना काँग्रेस नेत्यांकडून उजाळा
05:40
Video thumbnail
Latur|लक्ष्मण ढोबळेंच्या वक्तव्याविरोधात महिलांचा संताप
02:00
Video thumbnail
Latur|महादेव उबाळे यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील आरती संपन्न
08:58
Video thumbnail
🔴 LIVE - एकमत कार्यालयातील गणरायाची आरती |EKMAT DIGITAL
12:44
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये सफाई कामगारांचा ‘झाडू मोर्चा’; ईपीएफची रक्कम देण्याची मागणी
02:02
Video thumbnail
Latur|शासन निर्णयाची होळी! ग्रामरोजगार सहाय्यकांचा थेट इशारा
03:28
Video thumbnail
Latur|तुटपुंजी मदत नको! शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी
06:34
Video thumbnail
Latur| देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर शेतकऱ्यांनी थेटच बोलले
10:40
Video thumbnail
CM Devendra Fadanvis|दोन दिवसांत जीआर! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा
05:52
Video thumbnail
🔴 LIVE मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर दौऱ्यावर; शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया| Ekmat Digital
12:19

Latest news