चाकूर : प्रतिनिधी
गणेशोत्सव काळात पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित आदर्श गणेश मंडळ स्पर्धेत आंबेवाडी (ता.चाकूर) येथील नवतरुण गणेश मंडळाने प्रथम पुरस्कार मिळवला आहे. व्दितीय बाल गणेश मंडळ नांदगाव तर तृतीय पुरस्कार एकता गणेश मंडळ तेलगाव यास मिळाला आहे.
चाकूर पोलीस ठाणे हद्दीतील गणेश मंडळांना सामाजिक कार्यात अग्रेसर करण्यासाठी व गणेश मंडळाच्या माध्यमातून समाजात आदर्श निर्माण करण्यासाठी, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, कवी संमेलन, कुस्ती स्पर्धा, वृक्षारोपण, पारंपारिक वाद्याचा वापर, शाळेला शिक्षण उपयोगी साहित्य वाटप अशा अनेक उपक्रम राबवून गणेश मंडळांना सामाजिक कार्यात अग्रेसर करण्यासाठी आदर्श गणेश मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गणेश मंडळांनी सहभाग घेऊन सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते. श्री गणेशाची मिरवणूक पारंपारीक वाद्य वाजवत काढली होती.
आदर्श गणेश मंडळ स्पर्धेत आंबेवाडी (ता.चाकूर) येथील नवतरुण गणेश मंडळाने प्रथम पुरस्कार मिळवला आहे. व्दितीय बाल गणेश मंडळ नांदगाव तर तृतीय पुरस्कार एकता गणेश मंडळ तेलगाव (ता.अहमदपुर) या गणेश मंडळाला मिळाला आहे. या पुरस्काराचे वितरण पोलिस अधीक्षक डॉ.सोमय मुंढे, सहाय्यक पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी, यांच्या हस्ते गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांचा गौरव करून पारितोषीक वितरण करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम व पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे यांनी परिश्रम घेतले त्याबद्दल पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी,पोलीस पाटील,नागरीक उपस्थित होते.