चिंचोली येथे अधीक्षक कृषी अधिका-यांची पीक पाहणी

जळकोट :  प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील चिंचोली येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी लातूर डी. बी. जाधव यांनी विविध कृषी योजनांच्या अंमलबजावणीची पाहणी करून शेतक-यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतीतील विविध समस्यांची माहिती घेत शेतक-यांना मार्गदर्शन केले.
महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण उप-अभियानांतर्गत ट्रॅक्टर, पलटी नांगर व इतर शेती अवजारांची पाहणी करण्यात आली तसेच राष्ट्रीय खाद्यतेल व गळीत धान्य अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या सोयाबीन पीक प्रात्यक्षिकालाही भेट देऊन पीकस्थितीची पाहणी करण्यात आली. जाधव यांनी शेतक-यांशी संवाद साधताना सोयाबीन पिकातील रोग व किडींचे व्यवस्थापन, योग्य औषध फवारणी, दर्जेदार बियाण्यांची निवड, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र शेतक-यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
या मार्गदर्शनामुळे उपस्थित शेतक-यांनी समाधान व्यक्त करीत कृषी विभागाच्या पुढाकाराचे स्वागत केले आणि अधिका-यांचे आभार मानले.  या पाहणीवेळी उपविभागीय कृषी अधिकारी उदगीर श्रेयश यादव, तालुका कृषी अधिकारी एस. आर. पाटील, उपकृषी अधिकारी गीते, धुपे, सहाय्यक कृषी अधिकारी संदीप पाटील, उमेश सूर्यवंशी, नारायण तौर, सुधाकर कांबळे, रोहित जनकेवाड तसेच शेतकरी निवृत्ती बट्टेवाड, संतोष बट्टेवाड, सुरेश गव्हाणे, सुभाष बोडेवार, सतीश वाघमारे आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news