लातूर : प्रतिनिधी
मुंबई येथे आयोजित इंडिया आर्ट फेस्टिवलमध्ये लातूरचे प्रतिभावान कलाकार ओम थडकर यांच्या चित्र प्रदर्शनास राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी ट्वेन्टिवन अॅग्रीच्या संचालीका सौ. अदितीताई अमित देशमुख यांच्यासह भेट देऊन पाहणी केली.
कलाकार ओम थडकर यांच्या चित्रकृतींचे सौंदर्यशास्त्र आणि भावनात्मक गहनता पाहून कौतुक केले, विशेष म्हणले लातूर तालुक्यातील बाभळगाव हे त्यांचे मूळ गाव असल्याने, हा लातूर जिल्ह्यासाठी अभिमानाचा विषय आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ओम थडकर यांच्या प्रत्येक चित्रात एक वेगळी कहाणी, एक वेगळा भाव असतो, असे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे. यावेळी ओम थडकर यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वांनी ओम थडकर यांचे चित्र प्रदर्शन पाहण्याचे आवाहन केले.