बिजींग : वृत्तसंस्था
चीनमध्ये फेब्रुवारी महिन्यापासून श्वसनाशी संबंधित कोविड-१९ सारख्या आजारानं कहर केला आहे. या आजाराने होणा-या मृत्यूमुळे आणि रुग्णालयात वाढणा-या रुग्णसंख्येने आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढला आहे. देशातील अनेक भागात कब्रस्तानात दफन करण्यासाठी जागा मिळत नसल्याचं समोर आलं आहे.
मृतदेहासाठी ताबूत मिळत नसल्याने त्याच्यासाठीही मनमानी पद्धतीने दर आकारले जात आहेत. बीजिंगच्या एका रूग्णालयात लोकांची आठवडे बाजारासारखी गर्दी झाल्याचा उल्लेख रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. चिनी सरकारने आजाराशी निगडित माहिती माध्यमांपासून लपवण्याचा आरोपही करण्यात येत आहे.
उत्तर चीनच्या हेबेई प्रांतात ताबूत मिळत नाहीत. पूर्व चीनच्या अनहुई आणि उत्तर पश्चिमेकडील शानक्सीच्या ग्रामीण भागात मोठ्या संख्येने नव्याने कब्रस्तान उघडण्यात आलेत. अनेक गावात भयाण शांतता दिसून येत आहे. कोविड-१९ सारख्या या आजाराने लोकांच्या मनात दहशत निर्माण केली आहे. हॉस्पिटलमध्ये एका बाजारपेठेसारखी गर्दी झाली आहे. कब्रस्तानात मृतांना दफन करण्यासाठी रांगा लागत आहेत.
एका शवपेटीची किंमत ४ हजार युआन होती ती आता अचानक १२ हजार युआनपर्यंत वाढवण्यात आली आहे. रस्ते ओस पडलेत, सगळीकडे भयाण शांतता आहे. लोकांनी घराबाहेर पडणेही सोडले आहे. अलीकडेच चीनच्या वैज्ञानिकांनी ऌङव5-उङ्म५2 नावाचा व्हायरस शोधला, कोविड-१९ सारखाच हा व्हायरस आहे. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी टीमने या शोध लावला. हा व्हायरस जनावरांपासून माणसांमध्ये पसरला जाण्याची शक्यता असल्याचे चिनी वैज्ञानिकांनी सांगितले.