30.4 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeअंतरराष्ट्रीयचीनला आणखी एक कोरोना व्हायरस सापडला

चीनला आणखी एक कोरोना व्हायरस सापडला

बीजिंग : चीनमधील एका टीमला नवा कोरोना व्हायरस सापडला. या नव्या व्हायरसचा प्राण्यांमधून माणसांना संसर्ग होण्याचा धोका आहे. हा व्हायरस त्याच मानवी रिसेप्टरचा वापर करतो, जो कोविड १९ करत होता. याबाबतचा अभ्यास आणि संशोधन शी झेंगली यांनी केले. ते कोरोना व्हायरसवरील तिच्या व्यापक संशोधनामुळे बॅटवुमन म्हणून देखील ओळखले जातात. वुहान विद्यापीठ आणि वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संशोधकांसह ते काम करतात.

कोविडच्या उत्पत्तीबद्दल वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या वुहान संस्थेत शि झेंगली काम करत आहेत. वुहान शहरातील प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरस लीक झाल्याचे आरोपही यापूर्वी झाले होते. कोरोना कोठून आणि कसा आला, याबाबत अद्याप ठोस माहिती नसली तरी, काही अभ्यासकांनी हा व्हायरस वटवाघळांमधून आला असल्याचे सांगितले होते. दरम्यान, वुहान इन्स्टिट्यूट कोरोनाच्या उद्रेकासाठी जबाबदार नसल्याचे शी झेंगली यांनी म्हटले. नवीन एचकेयू-५ हा नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस आहे. हाँगकाँगमधील जपानी पिपिस्ट्रेल वटवाघळांमध्ये हा विषाणू प्रथम आढळला होता. हा व्हायरस मर्बेकोवायरस सबजीन पासून उद्भवतो. यामध्ये मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (एमईआरएस) होणा-या विषाणूचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR