नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इस्रायलच्या नव्या युद्धनीतीने सा-या जगाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. सायबर आणि इलेक्ट्रॉनिक युद्धाची भीतीही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारही सतर्क झाले आहे.
चीनकडून सीसीटीव्ही कॅमे-यांच्या खरेदीवर बंदी आल्याने आता स्मार्ट मीटर, पार्किंग सेन्सर, ड्रोन पार्ट्स तसेच लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या खरेदीवर नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. ही उपकरणे चीनऐवजी इतर विश्वसनीय भागीदार देशांकडून घेतले जाऊ शकतात. याशिवाय भारतात त्यांच्या उत्पादनावरही भर दिला जाऊ शकतो. चीनमधून या उपकरणांची आयात खूप जास्त आहे. अशा स्थितीत या अवलंबित्वाचा चीन कधीही फायदा घेऊ शकतो, अशी भीती केंद्र सरकारला वाटत आहे. ज्या उपकरणांमध्ये चीप वापरली जाते अशा सा-या वस्तूंच्या आयातीवर डिसेंबर अखेर पर्यंत नियंत्रण आणि देखरेख ठेवण्याचे आदेश वाणिज्य मंत्रालयाने दिले होते.
चीनमधून होणा-या आयातीवर लक्ष ठेवण्यासाठी आणखी काही ऑर्डर येऊ शकतात. सरकार अशी प्रणाली आणणार आहे, या प्रणालीद्वारे सीसीटीव्ही कॅमे-यांसह सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू भारतात वापरण्यापूर्वी प्रमाणित केल्या जातील.
चीनी कंपन्यांचे मोबाईल भारतात जास्त येतात
भारतीय लष्कराने यापूर्वीच दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चीपपासूनच्या धोक्याचा इशारा दिला आहे. नवीन प्रकारच्या युद्धांच्या काळात सरकारला कोणताही धोका पत्करायचा नाही. चीनच्या कंपन्या भारतात स्मार्टफोन विकण्यातही आघाडीवर आहेत. शाओमी, रियल मी, ओप्पो अशा अनेक चीनी कंपन्या आहेत, या कंपन्यांचे मोबाईल भारतात मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत.