लातूर : प्रतिनिधी
सहकार आणि साखर उद्योगाच्या यशस्वी वाटचालीसाठी पथदर्शी ठरलेल्या विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांची तर व्हाईस चेअरमनपदी वैजनाथराव शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. विलास सहकारी साखर कारखान्याची २१ जागेसाठी सन २०२५ ते २०३० साठी पंचवार्षीक निवडणुक झाली. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री आणि लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, मुख्य प्रतोद विधीमंडळ काँग्रेस, महाराष्ट्र विधानसभा, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विलासराव देशमुख सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणुक लढवली. विलास सहकारी साखर कारखान्याची उभारणीपासूनची वाटचाल पाहता सर्वसभासदांनी ही निवडणुक बिनविरोध निवडूण दिली आहे.
विलास कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यानंतर चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड प्रक्रिया मंगळवार दि. १५ एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी तथा अध्याशी अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे यांच्या अध्यक्षमेखाली निवड प्रक्रीया पार पडली. चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी झालेल्या बैठकीस माजी आमदार वैजनाथराव शिंदे, रविंद्र काळे, रणजित राजेसाहेब पाटील, अनंत व्यंकटराव बारबोले, रसूल दिलदार पटेल, तात्यासाहेब छत्तू पालकर, गोवर्धन मोहनराव मोरे, हणमंत नागनाथराव पवार, नरसिंग दगडू बुलबुले, नेताजी शिवाजीराव साळुंके (देशमुख), नितीन भाऊसाहेब पाटील, रामराव विश्वनाथ साळुंके, अमृत हरिश्चंद्र जाधव, सतीश विठ्ठलराव शिंदे (पाटील), दीपक अर्जुन बनसोडे, लताबाई रमेश देशमुख, शाम भारत बरुरे, सुभाष खंडेराव माने संचालक यांच्यासह सहायक निबंधक रेणापूर आर. एल. गडेकर, नायब तहसीलदार अर्चना मैंदर्गी, नायब तहसीलदार सुधीर देशमुख, महसुल सहायक ओमप्रकाश मेहकर यांची उपस्थिती होती. सर्व संचालक मंडळाची बैठक होऊन बिनवीरोध निवड प्रक्रीया पार पडली. विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांची तर व्हाईस चेअरमनपदी वैजनाथराव शिंदे यांची बिनविरोध निवड यावेळी झाली. यावेळी बोलतांना नूतन चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी मनोगत व्यक्त करून विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी सर्वांनी काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. यावेळी बोलतांना नूतन व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे म्हणाले की, या विलास कारखान्याला जमीन खरेदी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले.
देशात राज्यात एक नंबरचा हा कारखाना नावाजलेला आहे, लोकनेते विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना उभा राहिला आहे. लोकनेते विलासराव देशमुख नेहमी म्हणायचे, आपण कारखान्याचे मालक नाही आहोत आपण फक्त विश्वस्त आहोत. विलास सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी सर्व नेत्यांनी मला काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. प्रास्ताविक माजी व्हाईस चेअरमन रवींद्र काळे यांनी करुन नूतन चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख व व्हाईस चेअरमन माजी आमदार वैजनाथराव शिंदे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच व्हा. चेअरमनपदी पाच वर्षे काम करण्याची संधी दिल्याबद्दल मान्यवरांचे त्यांनी आभार मानले. प्रारंभी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख व मान्यवरांनी विलास सहकारी साखर कारखाना परिसरातील लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, टवेन्टिवनचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, पी. के. पाटील, राजेंद्र मस्के, भैरवनाथ सुर्यवंशी, बळवंत काळे, राजाभाऊ जाधव, चंद्रशेखर दंडीमे, रामचंद्र सुडे, उमेश बेद्रे, चंद्रकांत टेकाळे, जयचंद भिसे, रमेश थोरमोटे पाटील, जगदीश चोरमले, प्रभावती माळी, सुभाष जाधव, अनिल पाटील, गोविंद बोराडे, भैरवनाथ सवासे, गुरुनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, सुर्यकांत सुडे, भारत आदमाने, संजय पाटील खंडापूरकर, ज्ञानोबा पडीले, रमेश देशमुख आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल इंगळे पाटील यांनी केले तर शेवटी आभार माजी व्हाईस चेअरमन गोविंद बोराडे यांनी मानले.