चेन्नई : महेंद्रसिंग धोनी कर्णधार म्हणून आला, पण आयपीएल २०२५ च्या २५ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजीने कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांसमोर पूर्णपणे शरणागती पत्करली. चेन्नईला आपल्याच मैदानावर लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नईला सलग पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे संघ पॉईंट टेबलमध्ये तळाशी गेला आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने ६ पैकी फक्त १ सामना जिंकला आहे आणि पॉइंट टेबलमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे. त्यांना आणखी ८ सामने खेळायचे आहेत, पण प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना किमान ७ सामने जिंकावे लागतील. त्यामुळे ७ सामने जिंकण्याचे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलमधून जवळपास बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे.
चेन्नईने केकेआरला विजयासाठी १०४ धावांचे आव्हान दिले होते. केकेआरने हे आव्हान १०.१ ओव्हरमध्ये २ विकेट्स गमावून पूर्ण केले. केकेआरने १०७ धावा केल्या. या विजयासह केकेआरने मोसमातील एकूण तिसरा विजय मिळवला तर चेन्नईचा हा घरच्या मैदानातील सलग तिसरा आणि एकूण सलग पाचवा पराभव ठरला.