लातूर : प्रतिनिधी
मुरुडमधील सावता माळीनगरमध्ये चोरटी विदेशी दारुविक्री मोठ्या प्रमाणात सुरु असल्याची माहिती मिळताच मुरुड पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकली. या धाडीत पोलिसांनी ३४ हजार १३० रुपयांची विदेशी दारु जप्त केली. दरम्यान आरोपी फरार झाला आहे.
पोलिसांनी सांगीतले, मुरुडच्या सावता माळीनगरमध्ये आरोपी सुनील मारुती गायकवाड हा विना परवाना चोरट्या पद्धतीने विदेशी दारु विक्री करीत आहे. दि. २० फेबु्रवारी रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच सुनील गायकवाड पळून गेला. पोलिसांनी सदर ठिकाणाहून विदेशी दारुचा ३४ हजार १३० रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार मन्मथ माधवराव हिंगमिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी सूनील मारुती गायकवाड याच्याविरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक उजगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पाटील अधिक तपास करीत आहेत.