21.3 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeमहाराष्ट्रछगन भुजबळ नाराज

छगन भुजबळ नाराज

मंत्रिमंडळातून डच्चू, शपथविधीला दांडी
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात मराठा आंदोलन तीव्र झाले. ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी प्रखर होताच छगन भुजबळ मैदानात उतरले. त्यांनी ओबीसी आंदोलनाचे नेतृत्व केले. राज्यात ओबीसी परिषद आणि सभा घेतल्या. राज्यात मराठा आणि ओबीसी असे ध्रुवीकरण झाले. छगन भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीत विजयश्री खेचून आणली. यापूर्वीच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे महत्त्वाचे खाते होते. महायुतीच्या सध्याच्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागेल, अशी अखेरपर्यंत त्यांच्या समर्थकांना आशा होती. पण त्यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे ३३ वर्षांपूर्वीच्या त्यांच्या नागपूर येथील शपथविधीची चर्चा होत आहे. दरम्यान, भुजबळ नाराज असून, त्यांनी शपथविधीला दांडी मारली. त्यामुळे याची चर्चा रंगली आहे. यासोबतच दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे यांनाही वगळले.

दरम्यान, भुजबळ यांना खासदार नितीन पाटील यांच्या जागेवर राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. परंतु ते विधानसभा सोडून राज्यसभेवर जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, मंडल आयोगावरून १९९१ मध्ये देशभरात वातावरण तापले होते. महाराष्ट्रातसुद्धा मंडल आयोगावरून वादळ आले होते. त्यात छगन भुजबळ यांनीसुद्धा उडी घेतले. ते शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जायचे. पण त्यांनी मंडल आयोगाच्या मुद्यावरून शिवसेनेला पहिले खिंडार पाडले. त्यावरून राज्यात एकच खळबळ उडाली. २१ डिसेंबर १९९१ रोजी राज्याची उपराजधानी नागपुरात तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ हे सहभागी झाले. नागपूरमध्ये हा मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. नागपूरमधील राजभवनात त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना भुजबळ यांनी ११ सहका-यांसह शिवसेनेला भगदाड पाडले होते. या घटनेने राज्यात एकच गजहब झाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR