सुकमा : प्रतिनिधी
छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यातील कोटा कीष्टराम जंगलात दोन्ही बाजूने गोळीबार सुरू आहे.
३ जानेवारी पहाटेपासूनच ऑपरेशन सुरू झाले होते.डीआरजी व सीआरपीएफ पोलिसांच्या ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी जंगलात प्रवेश केल्यानंतर माओवादी संघटनेने हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर देत जवळपास दीड तास चकमक चालली.
माओवाद्यांचे १२ शवासह एके-४७ अत्याधुनिक रायफल पोलिसांनी जप्त केली आहे. कोटा येथील पोलिस अधीक्षक किरण चव्हाण यांनी ही माहिती दिली. या वर्षी मार्च महिन्यापर्यंत देश नक्षलमुक्त करण्याचा विडा केंद्र सरकारने उचलला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सुरक्षा यंत्रणा आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक उडालेली आहे.

