34.6 C
Latur
Monday, March 31, 2025
Homeमहाराष्ट्रछत्तीसगडमध्ये १६ नक्षलवादी ठार; दंतेवाडामध्ये शोधमोहिमेला वेग

छत्तीसगडमध्ये १६ नक्षलवादी ठार; दंतेवाडामध्ये शोधमोहिमेला वेग

छत्तीसगड : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा दलांनी आक्रमक कारवाया करत नक्षलवाद्यांना जेरीस आणले आहे. दरम्यान आज छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी आणखी एक मोठी कारवाई करत १६ नक्षलवाद्यांना ठार केले आहे. छत्तीसगडमधील सुकमा आणि दंतेवाडा सीमा परिसरात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे.

या चकमकीदरम्यान दोन्हींकडून सातत्याने गोळीबार सुरू असून, यात माओवाद्यांना जबर नुकसानीचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत सुमारे १६ नक्षलवादी ठार झाले आहेत. तसेच नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी आक्रमकपणे शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १६ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. तर या चकमकीत दोन जवानही किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सुकमा जिल्ह्यात शनिवारी सकाळी सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही चकमक केरलापाल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका जंगलात झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR