27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रछत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाला सामर्थ्य दिले : पंतप्रधान मोदी

छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाला सामर्थ्य दिले : पंतप्रधान मोदी

मुंबई : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (१५ जानेवारी) आयएनएस सुरत, आयएनएस वाघशीर, आयएनएस निलगिरी या युद्धनौका आणि पानबुडीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी लष्कर दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी संवाद साधताना, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाची स्थापना केली असून त्यांच्याच भूमीतून नौदलाला सामर्थ्य देण्याचा प्रयत्न होत आहे,’ असे म्हणत त्यांनी आत्मनिर्भर भारत अभियानासाठी हा सर्वात महत्त्वाचा दिवस असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

माझगाव डॉकयार्ड इथे हा कार्यक्रम पार पडला. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आयएनएस सूरत आणि आयएनएस निलगिरी या युद्धनौकांचे आणि आयएनएस वाघशीर या पाणबुडीचे जलावतरण झाले.

‘‘आपला निलगिरी चौल वंशाच्या समुद्री सामर्थ्यासाठी समर्पित आहे. सूरत वॉरशीप एका कालखंडाची आठवण करून देतो. जेव्हा भारत आशियाशी जोडलेला होता. त्याची आठवण देते. काही वर्षापूर्वी मला पहिल्या सबमरीनमध्ये सामील होण्याची संधी मिळाली होती. आता मला या क्लासच्या सहाव्या सबमरीनला कमिशन करण्याची संधी मिळाली आहे. हे दोन्ही प्लॅटफॉर्म भारताची सुरक्षा आणि प्रगतीसाठी सामर्थ्य देईल’’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

आपण विस्तारवाद नाही तर विकासवादाच्या भावनेतून काम करतो
‘‘भारत ग्लोबल साऊथमध्ये जबाबदार सहकारी म्हणून ओळखला जातो. भारत विस्तारवाद नाही तर विकासवादच्या भावनेतून काम करत आहे. नौसेनेला सशक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत’’ असं पंतप्रधान मोदी म्हणाले. ‘‘सागरचा अर्थ सेक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन दि रिजन. आपण सागरच्या व्हिजनने पुढे गेलो. जेव्हा आपण जी २०चं यजमानपद स्वीकारलं. तेव्हा वन अर्थ, वन फ्युचर वन फॅमिलीचा मंत्र आपण दिला. कोरोनाच्या काळात आपण वन अर्थ वन हेल्थ हा मंत्र दिला. आपण संपूर्ण जगाला आपलं कुटुंब मानतो. आपण सबका साथ सबका विकासचा सिद्धांत पुढे घेऊन जात आहोत. त्यामुळे या क्षेत्राचं संरक्षण करणं भारत आपलं दायित्व समजतो’’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR