30.3 C
Latur
Friday, April 18, 2025
Homeमहाराष्ट्रछत्रपती संभाजी महाराजांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानभवनात अभिवादन

छत्रपती संभाजी महाराजांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानभवनात अभिवादन

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवनात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पणन मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री पंकज भोयर,

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री योगेश कदम, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विधीमंडळ सदस्य, वरिष्ठ अधिकारी यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR