15.8 C
Latur
Friday, November 21, 2025
Homeधाराशिवछातीभर पाण्यात उतरले खासदार ओमराजे; आजी-नातवाला वाचवले

छातीभर पाण्यात उतरले खासदार ओमराजे; आजी-नातवाला वाचवले

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिवमध्ये आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडलाय. त्यामुळे अनेक ठिकाणी पुराची स्थिती निर्माण झाली आहे. पूरस्थितीमुळे गावांचा संपर्क तुटला आहे, जनावरे वाहून गेली आहेत. मागील दोन दिवसांत धाराशिवमध्ये पावसाने रौद्ररूप धारण केले असून लोकांची दयनीय अवस्था झाली आहे. याच धाराशिवकरांच्या मदतीला खासदार ओमराजे निंबाळकरही जिवाची बाजी लावत आहेत. रात्रीच्या अंधारात ओमराजे निंबाळकर छातीइतक्या पाण्यात उतरले अन् कुटुंबाला वाचवले.

ओमराजे निंबाळकर यांचा या मदतीचा व्हीडीओ सध्या समोर आला आहे. सोशल मीडियावर ओमराजे यांचे तोंडभरून कौतुक केले जात आहे. असा खासदार पुन्हा होणार नाही.. दादांना मतदान केल्याचे समाधान मिळाले, यासारख्या कमेंट्स केल्या जात आहेत. रात्रीच्या वेळी अक्षरश: गळ्यापर्यंत पाण्यात गेले २ दिवस ओमराजे निंबाळकर जनतेच्या मदतीला उतरले आहेत. अशी मदत करणारा हा पहिलाच लोकप्रतिनिधी असेल, धाराशिव जिल्ह्याचं खरंच नशीब आहे, यासारख्या कमेंट्स सोशल मीडियावर येत आहेत.

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर स्वत: पुराच्या पाण्यात उतरले. पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजी आणि नाताला वाचवण्यासाठी खासदारांनी जिवाची बाजी लावली. अन्न-पाण्याविना मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांना वाचवण्यासाठी खासदार पुराच्या पाण्यात उतरले. त्यांनी एनडीआरएफ टीमच्या मदतीने आजी अन् नाताचा जीव वाचवला.

निंबाळकर यांची फेसबुक पोस्ट
आज वडनेर (ता. परंडा) येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील एक आजी व २ वर्षांचा मुलगा व २ व्यक्तींना रात्री २ पासून पूर्ण पाण्याने वेढले होते जवानांच्या मदतीने मी स्वत: या कार्यात सहभागी होऊन कुटुंबाला सुखरूप बाहेर काढण्यात आज यश आल्याने मनाला खूप समाधान मिळाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR