21.7 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeलातूरछावाचे निवेदन तर मनसेचे आज आंदोलन

छावाचे निवेदन तर मनसेचे आज आंदोलन

औसा : प्रतिनिधी
मराठवाडा व विशेषत: लातूर, धाराशिव जिल्ह्यातील शेतक-यांचे प्रमुख पिक असणा-या सोयाबीन पिकाचा बाजारभाव दिवसेंदिवस कमी होत असून शेतक-यांंचे मोठे नुकसान   होत आहे. याबाबत औसा तालुक्यात अखिल भारतीय छावा संघटना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून मनसेच्या वतीने शुक्रवार दि १३ सप्टेंबर रोजी कँन्डल मोर्चाचे आयोजन केले आहे तर छावाने निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे .
  औसा तालूक्यासह राज्यामध्ये सोयाबीन उत्पादन अधिक आहे. गतवर्षीचा पिक विमा व शासनाने जाहीर केलेले अनुदान ई-पिक पाहणी न केलेल्या शेतक-यांंना अनुदानाचा लाभ मिळाला नाही व गतवर्षी हमी भाव ४६०० असून ही या भावात शेतक-यांंकडून खरेदी केली नाही. यावर्षी सोयाबिनला ८५०० हमी भाव करुन शासकीय खरेदी सुरू करुन सर्वच शेतक-यांची सोयाबीन खरेदी करुन शेतक-यांचे आर्थीक बळ वाढवावे. १९ लाख मॅट्रीक टन पामतेल व १५ लाख मॅट्रीक टन सोयाबिन बाहेरील देशातून खरेदी केले आहे. या निर्णयामुळे येथील शेतक-याांच्या सोयाबिनला भाव मिळणार नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये येणार आहेत या निर्णयाचा अखिल भारतीय छावा संघटना जाहीर निषेध करते. या वर्षी सोयाबिन ला ८५०० रु भाव द्यावा अन्यथा लवकरच छावा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात  येईल.असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने यावेळी देण्यात आला.
यावेळी शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील, सल्लागार भगवान माकणे,जिल्हाप्रमुख दिपक नरवडे, उपप्रमुख मनोज लंगर, विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख मनोज फेसाटे, औसा कार्याध्यक्ष नितीन साळुंके, रमाकांत करे, केशव पाटील, बालाजी माळी, मारुती मुडबे, राज जावळे, अविनाश जंगाले, महेश बिश्वास, गोपाळ चाळक, गणेश पाटील यांच्यासह पदाधिकारी  उपस्थित  होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ही दि.१३ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वा.औसा शहरात आयोजित केलेल्या ‘कॅन्डल मार्च’ आंदोलनात पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन मनसेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांनी केले  आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR