23.3 C
Latur
Sunday, January 26, 2025
Homeमनोरंजन‘छावा’तील आक्षेपार्ह दृश्यांना सरकारचाही विरोध

‘छावा’तील आक्षेपार्ह दृश्यांना सरकारचाही विरोध

 

मुंबई : वृत्तसंस्था
अभिनेता विकी कौशलचा बहुचर्चित सिनेमा ‘छावा’ वादाच्या भोव-यात सापडला आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणा-या विकी कौशलच्या डान्सवर शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त करत आक्षेपार्ह दृश्य वगळण्याची मागणी केली आहे. आता या संदर्भात महायुती सरकारमधील शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून म्हटले की, धर्मरक्षक, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणे ही आनंदाची गोष्ट आहे. छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहेत. मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याची मते अनेकांनी व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा त्याशिवाय प्रदर्शित करू नये, अशी आमची भूमिका आहे असे त्यांनी सांगितले.

त्याशिवाय महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी तातडीने या बाबत उपाययोजना करून आक्षेपार्ह काही असेल तर काढून टाकले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. चित्रपट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, त्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा मंत्री उदय सामंत यांनी निर्मात्यांना दिला आहे. त्यामुळे छावा सिनेमा रिलीज होण्याआधीच वाद पेटण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR