24.6 C
Latur
Thursday, February 20, 2025
Homeमनोरंजन‘छावा’ने सिंहासारखी गर्जना केली...; आयुष्मान खुराणा नि:शब्द

‘छावा’ने सिंहासारखी गर्जना केली…; आयुष्मान खुराणा नि:शब्द

मुंबई :
विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. प्रदर्शित होताच ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. या सिनेमाचे शो हाऊसफूल होत असून ‘छावा’ पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात गर्दी करत आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही ‘छावा’ सिनेमाचे कौतुक केले आहे. बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणाने ‘छावा’ सिनेमा पाहिला. विकी कौशलचा सिनेमा पाहिल्यानंतर अभिनेता नि:शब्द झाला आहे.

‘छावा’ सिनेमा पाहिल्यानंतर आयुष्मान खुराणाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने विकी कौशल आणि सिनेमाच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे. नुकताच ‘छावा’ सिनेमा पाहिला आणि सिनेमाने सिंहासारखी गर्जना केली आहे, असे आयुष्मान खुराणाने पोस्टमध्ये म्हटले आहे. या स्टोरीमध्ये त्याने विकी कौशल, रश्मिका मंदाना, लक्ष्मण उतेकर आणि अक्षय खन्ना यांना टॅगही केले आहे.

छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास आणि त्यांच्या बलिदानाची गाथा ‘छावा’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. या सिनेमात विकी कौशलने शंभूराजेंची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. लक्ष्मण उतेकरांचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात अभिनेता अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. अनेक मराठी कलाकार या सिनेमात झळकले आहेत. १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ सिनेमाने चारच दिवसांत १४० कोटींचा टप्पा पार केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR