31 C
Latur
Saturday, March 15, 2025
Homeमनोरंजन‘छावा’ ने मोडला ‘पठाण’चा विक्रम

‘छावा’ ने मोडला ‘पठाण’चा विक्रम

मुंबई : प्रतिनिधी
छत्रपती संभाजी महाराजाच्या पराक्रमाची आणि बलिदानाची गाथा असलेला ‘छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपल्या एक महिना पूर्ण करत आहे. ‘छावा’ च्या रिलीजला २९ दिवस पूर्ण झालेत. याकाळात चित्रपटानं अनेक विक्रमांना मागं टाकत आपली घोडदौड पुढं सुरू ठेवली आहे. ‘छावा’नं ‘गदर २’ च्या सर्वाधिक कमाईचा विक्रम २७ व्या दिवशीच मोडला. त्यानंतर आता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाचा रेकॉर्डही ब्रेक केला आहे. ‘छावा’नं २९ दिवसात बॉक्स ऑफीसवर किती कमाई केली आणि कोणते विक्रम मोडले यावर एक नजर टाका.

होळीच्या दिवशी म्हणजेच १४ मार्च रोजी ‘छावा’च्या रिलीजला २९ दिवस पूर्ण झाले. यादिवशी चित्रपटाच्या कमाईचा आलेख ६१.११ टक्क्यानं वाढला. ‘छावा’ची भारतातील एकूण कमाई ५४६.७५ कोटीवर पोहोचली आहे. ‘छावा’नं २९ व्या दिवशी ‘पठाण’चा ५४३.९ कोटी कमाईचा आकडा पार केला.

२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या ‘पठाण’नं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ५४३.९ कोटी रुपये कमावले होते. सॅकनिल्कच्या मतानुसार, ‘छावा’ हा चित्रपट ‘पठाण’चा विक्रम मोडून भारतातील सर्वाधिक कमाई करणारा नववा हिंदी चित्रपट बनला आहे. आता, ‘छावा’समोर ‘ऍनिमल’च्या आणि ‘स्त्री २’च्या विक्रमांना गवसणी घालण्याचं ध्येय आहे. भारतातील सर्वाधिक कमाई करणा-या चित्रपटांमध्ये ‘पुष्पा २’(१४७१.१ कोटी ), ‘बाहुबली २’ (१०३०.४२ कोटी), ‘केजीएफ2’ ( ८५९.७ कोटी), ‘आरआरआर’(५४६.३१ कोटी) आणि ‘जवान’ (६४०.२५ कोटी) या चित्रपटांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR