पुणे : प्रतिनिधी
रविवार २० जुलै रोजी लातूर येथे आखील भारतीय छावा संघटनेतील पदाधिका-यांना मारहाण अत्यंत निंदनीय असून आम्हाला अशी शंका आहे की हा हल्ला तटकरे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच घडवून आणलाय. हा तटकरे साहेबांनी सांगून घडवून आणलेला हल्ला आहे. म्हणजे किती मराठा द्वेष आहे यांच्यात यातूनही दिसून आल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यांवर केला आहे.
छावा संघटनेच्या विजयकुमार पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांना झालेल्या बेदम मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांनी कठोरातील कठोर कारवाई करावी. सोबतच मी आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना पदावरून हाकलून लावले पाहिजे. असे लोक पदावर ठेवण्याच्या कामाचे नसतात. एकीकडे राज्यात अजितदादांचा पक्ष वाढतो आहे. चांगल्या तरुणांचा त्यांना पाठिंबा मिळतो आहे. मात्र अशा नाकर्तेपणाचे कार्यकर्ते जर अशा मोठ्या पदांवर ठेवले तर ते असली हाणामारी करतात आणि त्याचा फटका अजित दादांना बसतो.
विजय भैय्या हे शेतक-यांचे लेकरू आहे. ते जर आज मागणी करायला गेलेत तर तुम्ही त्यांना मारता. म्हणजे हे तुम्हाला सोपं जाणार नाही. असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. अजित दादांनी कठोरात कठोर कारवाई करून केवळ पदावरूनच नव्हे तर पक्षातूनच हाकालपट्टी केली पाहिजे अशी मागणी ही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
मी पुणे दौ-यावर असतानाच ज्ञानेश्वरी मुंडे ताईंना भेटीसाठी येणार असल्याचे सांगितलं होतं. आज मी परळी येथे भेट घेत सविस्तर माहिती जाणून घेणार आहे. त्याच्या पतीची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. या विरोधात आम्ही राज्याचे एक नागरिक म्हणून उभे राहणार आहोत. सोबतच मुंडे ताईंना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. तसेच आज लातूरला जाऊन विजय भैय्या यांचे देखील तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी जात आहे. अशी माहितीही मनोज जरांगे पाटील यांनी यांनी दिली.