जळगाव :
भाजपमधून ठाकरे गटात आलेल्या माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. उन्मेष पाटील यांनी शेरोशायरी करत भाजपला खडेबोल सुनावतानाच अटल बिहारी वाजपेयी यांची कविता ऐकवत जोरदार हल्ला चढवला आहे.
‘छोटे मनसे कोई बडा नहीं होता, टूटे मनसे कोई खडा नहीं होता’ हे अटलजींचे वाक्य होते. भाजपमध्ये आता छोटे मन राहिले आहे. छोट्या मनाने जे राजकारण करतात ते अत्यल्प काळासाठी असते. दीर्घकाळ राजकारण करण्यासाठी मोठे मन लागते, असा हल्लाच उन्मेष पाटील यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासारखा निर्मळ, निष्कलंक मुख्यमंत्री होणे नाही हे महाराष्ट्रातील ३९ टक्के लोकांचे म्हणणे आहे. म्हणून मी ठरवलं कपटी मित्रांपेक्षा दिलदार शत्रू बरा, असे उन्मेष पाटील म्हणाले.