34.7 C
Latur
Sunday, April 13, 2025
Homeमहाराष्ट्रछ. शिवाजी महाराज महाराष्ट्रासाठीच नव्हे तर जगासाठी प्रेरणादायी

छ. शिवाजी महाराज महाराष्ट्रासाठीच नव्हे तर जगासाठी प्रेरणादायी

रायगड : महाराष्ट्र दौ-यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी किल्ले रायगडाला भेट दिली. अमित शाहांकडून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. शाहांसोबत फडणवीस, शिंदे, अजित पवारही उपस्थित होते. रायगडावरील पुण्यतिथी कार्यक्रमाला शाहांची उपस्थिती होती. यावेळी अमित शाह यांनी जनतेला संबोधित करताना छ. शिवाजी महाराज महाराष्ट्रासाठीच नव्हे तर जगासाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे.

मी शिवचरित्र वाचलंय. जिजाऊंनी छत्रपतींना स्वराज्याची प्रेरणा दिली. भूमीला स्वतंत्र करण्याचा विचार जिजाऊंनी दिला, बाल शिवाजींना छत्रपती बनण्याची प्रेरणा जिजाऊंनी दिली. म्हणून मी प्रथम जिजाऊंना वंदन करतो. स्वधर्म, स्वभाषेसाठी प्राण पणाला लावणारे अपराजित सैन्य या भूमीला लाभल्याचे अमित शाह म्हणाले.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रायगड दौ-यावर आहेत. जनतेला संबोधित करताना पुढे म्हणाले, चारही बाजून आदिलशाही, मुघलशाहीने घेरलेला महाराष्ट्र हिंदवी स्वराज्यामध्ये बदलला. अटकपासून कटकपर्यंत हिंदवी साम्राज्य पसरले.

हळुहळू स्वधर्माची भाषा लोकांना कळू लागली. एक १२ वर्षाचा मुलगा भगवा पसरवण्याची शपथ घेतो. एका मुलाने संपूर्ण देशाला स्वराज्याचा मंत्र दिला. छत्रपतींची सेना कटक, कर्नाटकपर्यंत पोहोचली तेव्हा लोकांना विश्वास वाटला की हा देश, धर्म वाचला. स्वातंर्त्याला १०० वर्षे होतील तेव्हा भारत विकसित झालेला असेल, याची मूळ कल्पना शिवरायांनी रचल्याचेही ते यावेळी म्हणाले.

शिवचरित्र भारतातील मुलांपर्यंत पोहोचवायला हवं. शिवरायांना महाराष्ट्रापर्यंत सिमीत ठेवून नका. देशासह जगभरात शिवराय पोहोचवायला हवे, स्वभाषा, स्वधर्म, स्वराष्ट्राचे रक्षण त्यांनी केले. गुलामिकतेची मानसिकता त्यांनी तोडली. मी भाषण करायला नाही आलो तर शिवरायांकडून प्रेरणा घेण्यासाठी आलोय, असेही अमित शाह म्हणाले.

रायगड पर्यटन नव्हे तर प्रेरणास्थळ बनवणार : अमित शाह

शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला ती हीच जागा आहे. शिवाजी महाराज यांचा जन्म झाला ती ही जागा आहे. शिवाजी महाराजांनी शेवटचा श्वास घेतला ती ही जागा आहे.

बालशिवाजीपासून ते छत्रपतीपर्यंतचा इतिहास या पवित्र भूमीत आहे. रायगड पर्यटन नव्हे तर प्रेरणास्थळ बनवण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध आहे. सातवीपासून ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी आले पाहिजे. त्यांनी महाराजांच्या कार्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी सांगितले. किल्ले रायगडावर शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथिनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

तिघांची औपचारिक एकत्रित बैठक नाही
उपमुख्यमंञी एकनाथ शिंदे राञी साडेबारा वाजता रिट्झ हॉटेलवर मुक्कामी पोहोचल्याने रात्री तरी त्यांची अमित शाहांसोबत बैठक अशी झालीच नाही. सकाळी देखील या तिघांची औपचारिक एकञित बैठक अशी झालीच नाही कारण अमित शाहांना भेटायला भाजपचे स्थानिक नेते येत होते.अजित दादा देखील थेट एअरपोर्टवरच त्यांच्या स्वागताला हजर होते ते हॉटेलवर आले देखील नाहीत. सकाळी १०वाजून १० मिनिटांनी वाजता अमित शाह यांचा ताफा पुणे विमानतळाकडे गेला त्यावेळी माञ अमित शाह, सीएम देवेंद्र फडणवीस आणि डीसीएम एकनाथ एकाच गाडीत बसून एअरपोर्ट ला गेले.पुढे ते सर्वजन एकाच विमानात बसून रायगडला पोहोचले.

पालकमंत्रीपदावर तोडगा नाही
या दौ-यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी शाह यांना जेवणासाठी आमंत्रित केले.हे आमंत्रण त्यांनी स्वीकारले असून ते दुपारी दोनच्या सुमारास तटकरे यांच्या रोह्यातील निवासस्थानी स्रेहभोजन करणार आहेत. या स्रेहभोजनात शाहंसाठी तटकरे फक्कड कोकणी बेत आखणार आहेत. शिवाय सध्या हापूस आंब्याचा सिझन असल्याने आमरस आणि आंब्याचे इतर पदार्थही असणार आहेत. रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिवसेना आणि राष्ट्रवादीचाही दावा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती दिलीय. मात्र यावर अजून तोडगा निघालेला नाही. त्याचवेळी अमित शाह रायगड दौ-यात पालकमंत्रीपदाचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. तटकरेंच्या रोह्यातील निवास्थानाचे भोजन यासाठी महत्वाचे मानले जातंय.. मात्र यामुळे शिवसेनेत अस्वस्थता असल्याची चर्चा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR