33.2 C
Latur
Monday, May 19, 2025
Homeमहाराष्ट्रजगबुडी नदीत कार कोसळून ५ ठार

जगबुडी नदीत कार कोसळून ५ ठार

अंत्यसंस्काराला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला

खेड : प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पहाटे भरणे जगबुडी पुलावरून नदी पात्रात मोटार कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.मुंबईतील मिरा रोड येथून मिताली मोरे ही वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांसह माहेरी जात होती. देवरुख येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी निघाले असताना पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास खेडजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांची कार थेट जगबुडी नदीच्या पात्रात जाऊन पडली.

मोटारीतून विवेक श्रीराम मोरे, मिताली विवेक मोरे, मिहार विवेक मोरे, श्रेयस राजेंद्र सावंत भाचा, परमेश पराडकर, मेघा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर हे प्रवास करत होते. त्यांच्या पैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे असे समजते.

कारचा वेग अधिक असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा दुर्दैवी अपघात झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, परंतु पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR