औसा : प्रतिनिधी
आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रचार सभेला असलेली लोकांची गर्दी सांगत आहे की, जनतेचा आशिर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी केलेल्या विकास कामातून आज औशाची चर्चा राज्यात असून विकासाच हा रथ पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे काम जनतेने करायचे आहे असे सांगून राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे. त्यामध्ये विकासाचा अधिकचा वाटा घेण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांचे हात बळकट करावे असे आवाहन शरण बसवराज पाटील यांनी केले आहे.
आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी तांबाळा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर आमदार अभिमन्यू पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिपकराव, विनोद आर्य, धम्मानंद कांबळे, उध्दव मेकाले, दाऊद पटेल, शिवचरण पाटील, बसवराज पाटील, शरणाप्पा मुळे, संजय सोनकांबळे, शिवंिलंग स्वामी, आलू महाराज स्वामी, शिवंिलग स्वामी, सुनील माने, ओम बिराजदार, ज्ञानेश्वर वाकडे, नितीन पाटील, मल्लिकार्जुन दानाई, कल्पना ढविले, संगीता कदम आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने म्हणाले की, आमदार अभिमन्यू पवार यांनी या पाच वर्षांत विकासाची अनेक कामे पूर्ण करीत या विकासाने मागासलेल्या भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक गावात चार ते पाच कोटींचा निधी देऊन त्या भागातील मुलभूत सुविधा उपलब्ध करून देत असताना कुठेही जात, पात, धर्म हा भेदभाव केला नाही.
विकासाचा समांतर वाटा देणा-या या नेतृत्वाचे हात आपण मजबूत केले पाहिजेत मराठवाड्यात सर्वाधिक मताधिक्याने ही जागा निवडून आणायची जबाबदारी आता आपली असून राज्याच्या मंत्रिमंडळात आमदार अभिमन्यू पवार यांना स्थान मिळणार असून त्यामुळे याभागातील विकासाला आणखी गती मिळणार आहे. महाविकास आघाडीच्या भूलथापांना बळी पडू नका महायुतीच्या सरकारने सर्व सामान्यांच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पोटात गोळा उठला असून या योजना बंद व्हावा म्हणून त्यांचा आमदार सुनील केदार यांनी न्यायालयात धाव घेतली होती. याचा जाब तुम्ही मत मागायला येणा-या ठाकरेंच्या उमेदवारांना विचारला पाहिजे, असे माने यावेळी म्हणाले.