पुणे : प्रतिनिधी
निवडणुकीमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी कधी कोणत्या राजकीय पक्षात राहतील हे नक्की सांगता येत नाही यासाठी जनतेच्या मनात विश्वासार्हता निर्माण करण्याची गरज आहे हे केवळ एका राजकीय पक्षापुरते मर्यादित नाही तर सर्व राजकीय पक्षांना हे लागू आहे असे मत राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र व्हीजन २०५०’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष सुनीत भावे आणि सरचिटणीस मीनाक्षी गुरव व्यासपीठावर होते.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यापुढील विविध आव्हाने हा प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा व्याख्यानाचा विषय होता.
लोकप्रतींनिधींच्या राजकीय भूमिकेचा परिणाम हा प्रशासनावर होत असती असे नमूद करून ते म्हणाले, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विश्वासार्हता गमावली आहे असे नमूद करून ते म्हणाले , ही विश्वासार्हता नव्याने वाढविणे ही आजच्या काळाची आवश्यकता आहे.एका अर्थाने हे आव्हान सर्वच राजकीय पक्षांसामोर आहे. याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. याबरोबरीने जगातील गरजा आणि वातावरण लक्षात घेता शिक्षण पद्धती आदर्श करण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे कारण त्याचे दूरगामी परिणाम होणे शक्य आहे त्याबरोबर दूरगामी सकारात्मक परिणाम होणारे निर्णय घेण्याची गरज आहे आणि हे एक आव्हान असणार आहे.
राज्यात अनेक समस्या
पाण्याच्या उपलब्धतेचा असमतील, तसेच समस्यांची सोडवणूक करणारे सरकार हवे, राज्यातील विविध जिल्ह्यांत शाळांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे गुणात्मक वाढ किती याचा विचार,ज्या विभागात पाण्याची मुबलकता आहे तेच अतिरिक्त पाणी गरजू भागाला देण्याची भूमिका हवी. समाजात धर्म निरपेक्ष भावना वाढीस लावण्यासाठी धोरण मागासलेल्या भागात पायाभूत सुविधांची उपलब्धता,आणि शालेय स्तरावर संस्कारक्षम विद्यार्थी तयार करण्याची गरज होय. त्या त्या भागाच्या रोजगाराच्या गरजा पाहून आर्थिक गुंतवणुकीवर भर दिला पाहिजे.आणि ठिकठिकाणी होत असणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता सार्वजनिक व्यवस्थेवर अधिक भर देण्याची गरज आहे असे त्यांनी संगितले.