28.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रजनतेने मला का थांबवलं याचा विचार करतेय

जनतेने मला का थांबवलं याचा विचार करतेय

अमरावती : प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला. येथे काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांनी १९ हजार ७३१ मतांनी राणा यांचा पराभव केला. यानंतर पहिल्यांदाच नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना आपले मत मांडले. अमरावतीच्या जनतेने मला का थांबविले, याचा मी विचार करत आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत.

माजी खासदार राणा पुढे म्हणाल्या, ‘पाच वर्षांपूर्वी जनतेने अमरावतीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मला दिल्लीला पाठवले होते. परंतु, यंदा मला त्यांनी का थांबवले, हे मला अजूनही समजू शकलेले नाही. मात्र, हा पराभव म्हणजे शेवट नाही, गेल्या पाच वर्षांत मी प्रामाणिकपणे काम केले आहे’ असेही त्या म्हणाल्या आहेत.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्या म्हणाल्या, ‘नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमधील मतांचं प्रमाण बघा. भाजपला सर्वाधिक मते मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या पोपटाचे ऐकण्याची आवश्यकता वाटत नाही. तसेच उद्धव ठाकरे ज्या सुरात नरेंद्र मोदींना निमंत्रण देऊ असे बोलत होते, त्यांनी आता पाहिले असेल की खरा वाघ कोण आहे. तसेच मला वाटते की मी आता पराभूत झाले आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता हनुमान चालीसा पठण करायला हवी.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR