लातूर : प्रतिनिधी
ज्ञानतीर्थ युवक महोत्सवात दयानंद कला महाविद्यालय लातूर यांनी १३ सुवर्ण, ४ रौप्य व १ कांस्य अशा १७ पदकासह जनरल चॅम्पियनशिप प्राप्त करून हॅट्रिक मिळविली. यापूर्वी २ वेळा हॅट्रिकने हुलकावणी दिली होती. यावेळेस मात्र सर्वांच्या अथक परिश्रमातून हॅट्रिक प्राप्त केली.
सहयोग शिक्षण संस्था, नांदेड येथे पार पडलेल्या ज्ञानतीर्थ युवक महोत्सवात स्वरांजली पांचाळ हिला सुगम भारतीय मध्ये सुवर्णपदक, ऋचा कुलकर्णी हिने शास्त्रीय नृत्य, सुगम पाश्च्यात्य व पाश्च्यात्य समूह मध्ये सुवर्णपदक पटकावले, दिग्दर्शन मध्ये पवन माने यास सुवर्णपदक, अर्जुन पवार यांना नक्कल मध्ये सुवर्णपदक, सौदागर सूर्यवंशी यांना स्थळ छायाचित्र मध्ये सुवर्णपदक, ज्ञानेश्वर साठे यास पोस्टर व चित्रकला मध्ये सुवर्णपदक, शास्त्रीय गायनात यशराज शेवाळे द्वितीय, तनुजा शिंदे हिने स्त्री अभिनयात सुवर्णपदक पटकावण्या बरोबरच लावणी मध्ये द्वितीय, कव्वाली-प्रथम, एकांकिका-प्रथम, फोक ऑर्केस्ट्रा-द्वितीय, प्रहसन स्कीट-द्वितीय, मुक अभिनय-तृतीय, सर्वसाधारण विजेतेपद विजेत्या संघातील विद्यार्थ्यांबरोबर सर्व मार्गदर्शक व साथीदार यांचे कौतुक करण्यात आले. तसेच डॉ. संतोष पाटील, डॉ देवेंद्र कुलकर्णी, डॉ. संदीपान जगदाळे, प्रा. शरद पाडे, प्रा विजय मस्के, प्रा. सोमनाथ पवार, डॉ. मीना घुमे, बालाजी सुळ, सूरज साबळे, नवलाजी जाधव, सिद्धार्थ सूर्यवंशी, रूपक, यांनी मार्गदर्शन केले. तर रुपेश सूर्यवंशी, पवन महाराज, नितीन पुट्टेवाड, ज्योतिबा बडे, इरफान पठाण, शिवाजी सोमवंशी, हणमंत शिंदे, पुरुषोत्तम गोदाम, हरी कुंभार यांनी सहकार्य केले.
या यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरंिवद सोनवणे, ललितकुमार शाह, रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, कोषाध्यक्ष संजय बोरा, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, पिआरओ अनिलकुमार माळी, उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे, पर्यवेक्षक डॉ. प्रशांत दीक्षित, कार्यालयीन अधीक्षक संजय व्यास, सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.