22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरजन्म-मृत्यू दाखले तीन दिवसांत

जन्म-मृत्यू दाखले तीन दिवसांत

मित्रांच्या साक्षीने विवाह नोंदणी प्रमाणपत्र

सोलापूर : मनपाकडे अर्ज केल्यानंतर आता सात दिवसांऐवजी तीन दिवसांतच जन्म-मृत्यू नोंदणीचे दाखले मिळतील. विवाह नोंदणी प्रमाणपत्रांसाठी आई-वडील किंवा सख्खे भाऊ-बहीण यांच्या साक्षीची गरज नाही. नातेवाईक अथवा मित्रांच्या साक्षीने प्रमाणपत्र मिळतील, असे मनपा उपायुक्त आशिष लोकरे यांनी स्पष्ट केले.

उपायुक्त लोकरे यांनी आरोग्य अधिकारी डॉ, मंजिरी कुलकर्णी व सह निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेतली. दाखले मंजूर करताना नोंदणी कार्यालयातील कर्मचारी परंपरेनुसार अथवा आपल्या मर्जीनेच नियम लावत असल्याचे उपायुक्तांच्या लक्षात आले. शासनाने वेळोवेळी दिलेले आदेश त्यानुसार कार्यवाही करा असे उपायुक्तांनी समजावून सांगितले. यावेळी मनपाच्या वेबसाईटवर कागदपत्रांची माहिती अपडेट केली जाणार आहे.

दाखल्यांसाठी अर्ज केल्यानंतर सात दिवसांत दाखला देऊ,असे मनपा कर्मचारी पूर्वी सांगायचे. राज्य सेवा हक्क २०१५ नुसार जन्म व मृत्यू दाखल्यांसाठी अर्ज केल्यानंतर तीन दिवसांतच मंजूर करावा लागेल. नावांमध्ये बदल अथवा दुरुस्ती असल्यास सात दिवसांमध्ये प्रकरणे निकाली काढावी लागतील. वरिष्ठांचे तत्काळ मार्गदर्शन घ्यावे लागेल.

विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी वधू-वरांकडून आधारकार्ड, लग्नपत्रिका, फोटो घेतले जातात. साक्षीदारांमध्ये आई-वडील, नातेवाईकच असावेत, असा मनमानी नियम कर्मचारी लावायचे. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण करायचे. प्रसंगी पैसे उकळायचे, मात्र, आता साक्षीदार म्हणून मित्रही चालतील. या मित्रांचे आधारकार्ड आवश्यक असेल. प्रसंगी वधू- वरांचे स्वंयघोषणापत्रही घेण्यात येईल. यात अडवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन आहे.

एखाद्या व्यक्तीचा घरातच नैसर्गिक मृत्यू झाल्यास डॉक्टरांचा दाखला आवश्यक. बीएचएमएस, बीएएमएस डॉक्टरांकडून दिलेले प्रमाणपत्र ग्रा धरण्यात येईल. यासाठी एमबीबीएस अथवा एमडी डॉक्टरांचा दाखला बंधनकारक नाही.

मनपातून कोणताही दाखला सहज मिळणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीनेच आम्ही कार्यवाही करीत आहोत. सर्व प्रक्रिया ऑनलाइन आहे. जन्मदाखला दुरुस्तीची ११०० प्रकरणे प्रलंबित आहेत. ही प्रकरणे सात दिवसांत निकाली निघतील. नागरिकांना अडचणी आल्यास थेट संपर्क करावा.असे मनपा उपायुक्त
आशिष लोकरे यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR