30.3 C
Latur
Monday, April 28, 2025
Homeक्रीडाजयपूरचा वैभवशाली विजय

जयपूरचा वैभवशाली विजय

गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई, ८ विकेटसनी विजय
जयपूर : वृत्तसंस्था
राजस्थान रॉयल्सने १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने केलेल्या ऐतिहासिक शतकी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सवर ८ विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला. गुजरातने राजस्थानला विजयासाठी २१० धावांचे आव्हान दिले होते. राजस्थानने हे आव्हान वैभवच्या वादळी खेळीच्या जोरावर सहज पूर्ण केले. राजस्थानने २५ बॉलआधी आणि २ विकेट्सच्या मोबदल्यात एकतर्फी विजय मिळवला.

राजस्थानने १५.५ ओव्हरमध्ये २१२ धावा केल्या. वैभव सूर्यवंशी व्यतिरिक्त यशस्वी जयस्वालने विजयात योगदान दिले. यशस्वीने नाबाद ७० धावा केल्या तर कर्णधार रियान परागही ३२ धावावंर नाबाद परतला. राजस्थानचा हा सलग पाचव्या पराभवानंतर पहिला तर एकूण तिसरा विजय ठरला. राजस्थानकडून वैभव आणि यशस्वी ही सलामी जोडी मैदानात आली. या सलामी जोडीने पाहता पाहता अर्धशतकी, शतकी आणि दीडशतकी भागीदारी केली. वैभवने या दरम्यान अवघ्या तिस-या सामन्यातच आयपीएलमधील पहिलंवहिलं आणि ऐतिहासिक शतक झळकावले. त्याने ३५ चेंडूत शतक केले. मात्र त्यानंतर वैभव आऊट झाला. प्रसिध कृष्णा याने वैभवला बोल्ड केले आणि ही सेट जोडी फोडली. मात्र तोवर राजस्थानच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला होता. वैभव आणि यशस्वी या दोघांनी अवघ्या ७१ बॉलमध्ये १६६ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली तर वैभवने ३८ चेंडूत ११ षटकार आणि १ चौकारांच्या मदतीने २६५.७९ च्या स्ट्राईक रेटने १०१ धावा केल्या.

वैभवनंतर मैदानात आलेला नितीश राणा ४ धावा करुन आऊट झाला. त्यानंतर कर्णधार रियान पराग आला. त्याने यशस्वीच्या साथीने फटकेबाजी करत राजस्थानला विजयापर्यंत पोहचवले. यशस्वी आणि रियान या दोघांनी तिस-या विकेटसाठी ४१ धावांची नाबाद भागीदारी केली. यशस्वीने ४० चेंडूत २ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने नाबाद ७० धावा केल्या तर रियानने १५ बॉलमध्ये २ सिक्स आणि तेवढ्याच चौकारांच्या मदतीने नाबाद ३२ धावांची खेळी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR