लातूर : प्रतिनिधी
आर्ट ऑफ लिव्हींगच्या वतीने जलयुक्त शिबिराची पहिली सुरुवात लातूरातून झाली. तन-मन-धनांने येथील युवकांनचे यात योगदान लाभल्याने लातूर टँकर मुक्त झाले असून जलयुक्त शिबीर यशस्वी पणे राबल्याने येथील नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागले. येथील शेतकरी ही समृद्ध बनला असल्याचे प्रतिपादन विश्वविख्यात आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी लातूर येथील आयोजित महासत्संग सोहळ्यात बोलताना केले.
विश्वविख्यात आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी या आयोजित सोहळ्यात हजारोंच्या संख्येने उपस्थित साधकाना आर्शिवचन देताना काही वर्षापुर्वी लातूरात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडल्याने लातूरला टँकरणे पाणीपुरवठा करावा लागला होता. येथील पाणी पातळी जवळपास हजार फुट खालावली होती. येथे २०१६ आलो होतो ती परस्थिती आता राहीलेली नाही. यानंतर येथे मोठे परिवर्तन झाल्याचे पहावयास मिळत असून लातूर हे नेहमीच कोणत्या ही कार्यात अग्रेसर राहणारे शहर आहे. लातूरने शिक्षण क्षेत्रात देशात मोठे नाव केले असून येथे व देशात आज मोठी बेरोजगारी आहे. ही बेरोजगारीची समस्या हटवणे हे आपले प्राधान्य असून आपले सहकार्य आवश्यक आहे. यातून मजबुत समृध्द भारत बनवु, असे नमुद या प्रसंगी करत त्यांनी चिंता करू नका गुरूदेव आहेत. मनात विश्वास ठेवायला हवा तसेच अंतर्मुख व्हा, मला हार तुरे काहीही नको ते आणू ही नका. मला आपल्या चेह-यावर कायम हसू हवे आहे. मला तुमच्या अडचणी, परेशांनी द्या, असे ही सांगितले.
जीनवानाला अध्यातमाची जोड द्या व जीवनाला विशाल दृष्टीकोणातून पहा. ४० वर्षातच राम राम सत्य नको ईश्वरासोबत जोडा. महाराष्ट्राच्या पावन धर्तीवर भक्तीचा ओढा पुर्वी ही होताच आता ही आहे. आपल्यात अनेक प्रतिभा आहेत. त्याला ओळखा, ज्ञान व विज्ञानाला सोबत घेऊन चालावे लागेल. जीवनात संकटे येतच राहतात. त्यावर मात करून चांगलच होईल, अशी आशा बाळगून प्रत्येकांनीच चालले पाहिजे.
ध्यान, अध्यात्माने मन शांत राहते, ध्यान करण्याचे अनेक फायदे असून शारिरिक मानसिकतेत वृध्दी होते. प्रत्येकांनी एका तरी वट वृक्षाची लागवड करावी व वट वृक्षाप्रमाणेच आपली संस्कृती जपली पाहीजे. मोठ्यांचा आदर सेवा व सन्मान करा याच बरोबर आपला अन्नदाता शेतकरी सुखी असला पाहीजे. शेतक-यांनी आपल्या शेतीत विविध प्रयोग करावेत. त्यांनी व प्रत्येकांनी आर्युवेदाला आत्मसात करायला हवे, असे आवाहन याप्रसंगी केले. जवळपास २० मिनीट त्यांनी साधकांसोबत ध्यानयोग केले व त्यांना ज्ञान गाण व ध्यानाचे महत्व पटवून दिले.