लातूर : विनोद उगीले
देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणातील व नुकताचा जामीननावर सुटलेला आरोपी जलीलखाँ पठाण याच्या विरोधात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणाची व विभागीय चौकशी अद्याप ही गुलदसत्यात असून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी जवळपास दोन वर्षापासून तर विभागीय चौकशी प्रकरणी मागील सात महिन्यांपासून प्राथमिक शिक्षण विभाग कागदी घोडे नाचवण्यातच व्यस्त आहे.
जलीलखाँ उमरखा पठाण याने कर्णबधीर असल्याचे बनावट प्रमाणपत्र मिळवले असून त्याने या बनावट कर्णबधीर प्रमाणपत्रा अधारे मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळवल्याचे ही समोर येत आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दि. १८ फेब्रवारी २०२३ रोजी अधुनिक लहुजी सेना या संघटनेने रितसर तक्रार देऊन बनावट कर्णबधीर प्रमाणपत्रा अधारे मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळवणा-या जलीलखाँ उमरखा पठाण याचेवर कारवाई करावी, अशी मागणी ही केली आहे.
प्राप्त तक्रारीवरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि. १४ मे २०२४ रोजी सुणावणी ही ठेवली होती. यासंदर्भात जलीलखाँ उमरखा पठाण याला शिक्षण विभागामार्फत दि. ९ मे २०२४ रोजी नोटीस बजावून सुणावणीस हजर राहण्या संर्दभात ताकीद ही देण्यात आली होती. मात्र या सुणावणीचे पुढे काय झाले हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.