जळकोट : प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने विशेष संयुक्त पथकाद्वारे मुख्य रस्त्यावर जळकोट ते नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर गिरीराज पेट्रोलियमच्यासमोर चेक पोष्टवर वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे कडेकोट पालन जळकोट प्रशासनाच्या वतीने केले जात आहे .
उपविभागीय अधिकारी सुशांत शिंंदे यांच्या आदेशानुसार तहसीलदार सुरेखा स्वामी, गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, पोलिस निरिक्षक प्रदीप काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, पंचायत समिती व पोलिस विभागाचे कर्मचारी या चेकपोष्टवर तैनात करण्यात आले आहेत. वेगवेगळ्या तीन वेळामध्ये कर्मचारी नेमले असून या पथकात ग्रामसेवक बी. आर. पोतदार, एस.एम. राजगिरवाड, विशाल साबळे, संकेत चट, कृषी सहायक विशाल इंगळे, संतोष नागमोडे, सुधाकर कांबळे, आय. बी. चंदनशिवे, एफ. शेख, एस. के. नागुरे, पोलिस कर्मचारी पद्माकर जायभाये, एम.वाय. कासार, मुबारक शेख, मुर्तुज तांबोळी, शिवंिलंग बनसोडे, शुभम टाले यांचा समावेश आहे. हे कर्मचारी २४ तास वाहनांची तपासणी करीत आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कर्मचारी कर्तव्य बजावत असून वाहनचालकांनी वाहने थांबवून तपासणीसाठी त्यांना सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे व तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी केले आहे.