37.7 C
Latur
Monday, March 31, 2025
Homeलातूरजळकोट तहसील कार्यालय परिसरात झाडांमुळे थंडावा

जळकोट तहसील कार्यालय परिसरात झाडांमुळे थंडावा

जळकोट : ओमकार सोनटक्के
जळकोट तहसील परिसरामध्ये प्रशासनाच्या वतीने एक वेगळी संकल्पना म्हणून परसबाग उभारण्यात आली. आता या परसबागेचे रूपांतर मोठ्या वृक्षामध्ये झालेले आहे . सध्या जळकोट तालुक्यामध्ये सूर्य आग ओकत आहे . अशा परिस्थितीत जळकोट तहसील परिसरात मात्र थंडगार वातावरण आहे . या वृक्षामुळे नागरिकांना बसण्यासाठी सावली उपलब्ध झाली आहे .

संत तुकाराम महाराजांनी वृक्षांचे मानवाशी असलेले नाते व वृक्षाचे महत्त्व सांगताना अतिशय सुंदर असा अभंग सांगितला आहे तो म्हणजे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे । आळविती’ जळकोट तहसील परिसरामध्ये तहसील कार्यालय उभारल्यानंतर , अगदी डोंगरी भागात आहोत की काय अशी परिस्थिती या ठिकाणी होती .

उजाड माळरान आणि या माळराणावर तहसील कार्यालय उभारण्यात आले होते . यानंतर जळकोट तहसीलमध्ये तहसीलदार म्हणून लाभलेले संदीप कुलकर्णी यांनी जळकोट तहसील परिसरात परसबाग उभारण्याची संकल्पना आणली. त्यानंतर तहसील परिसरामध्ये कडुलिंब , वड, जांभूळ, कंरजी , यासारख्या शेकडो वर्षांची लागवड करण्यात आली . वृक्ष लावल्यानंतर पाण्याची व्यवस्था नव्हती , यानंतर सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनमधून वॉल्वमधून लिखित होणा-या पाण्यावर ही बाग जगवण्यात आली . यानंतर तत्कालीन तहसीलदार सुरेखा स्वामी यांनीही या बागेची काळजी घेतली व वृक्ष वाळणार नाहीत याची काळजी घेतली . काही वेळी तर विकतचे पाणी घेऊन या झाडांना घालण्यात आले . आजही या झाडाची काळजी तहसीलदार राजेश लांडगे हे घेत आहे .

या परसबागेचे आज एका छोट्याशा जंगलामध्ये रूपांतर झाले आहे . या वृक्षामुळे तहसील परिसर तर उठून दिसत आहे , यासोबतच या तहसील परिसरातील झाडाच्या खाली तालुक्यातून विविध कामासाठी आलेले नागरिक विसावा घेत आहेत. नागरिकांना बसण्यासाठी तहसील प्रशासनाच्या वतीने बँच ची देखील व्यवस्था करण्यात आली आहे . या झाडांना पाणी देण्याचे काम उत्तम कुणकीकर , सोनटक्के विराळकर , यांनी केले . तसेच ही झाडे जगावे व मोठी व्हावी याची काळजीसर्व कर्मचा-यांनी घेतली

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR