जळकोट : प्रतिनिधी
अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघटना व किरकोळ पन्हाळा धारक महासंघाच्या वतीने दि १ जानेवारीपासून राज्यातील विविध स्वस्त धान्य दुकानदार संपावर गेलेले आहेत . या संपामध्ये जळकोट तालुक्यातील ५७ रास्त भाव दुकानदार सहभागी झाले आहेत अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष पंडितराव गुट्टे व उपाध्यक्ष बापुराव हासुळे पाटील यांनी दिली.
रास्त भाव दुकानदारांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे हे बेमुदत उपोषण सुरू आहे. ही पॉश मशीनसाठी २ जी ऐवजी ५ सेवा देण्यात यावी, रास्त भाव दुकानदारांचे कमिशन व वाटपाचे कमिशन दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत दुकानदारांच्या खात्यावर जमा करावे, रास्त भाव दुकानदाराचे कमिशन वाढविण्यात यावेकिंवा प्रति महिना पन्नास हजार रुपये मानधन देण्यात यावे, शेतकरी योजनेचे धान्य सुरू करण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
जळकोट तालुक्यातील जळकोट, पाटोदा बुद्रुक, करंजी, लाळी बुद्रुक, सोनवळा, कोळनूर ,पाटोदा खुर्द, माळहिप्परगा, हळद वाढवणा, रावणकोळा, मरसांगवी, डोंगरगाव, तिरुका, घोणसी , धोंडवाडी, सुलाळी,चिंंचोली, अतनूर, अतनूर तांडा, शेंलदरा, स्वर्गा, वडगाव, होकर्णा, उमरदरा , केकतंिसंदगी, वांजरवाडा, चेरा, उमरगा रेतू, जगळपूर,डोमगाव, धामणगाव, जिरगा, हावरगा -, येलदरा, ढोरसांगवी, विराळ, कुणकी, गव्हाण, मेवापूर, शिवाजीनगर तांडा, शिवाजीनगर तांडा पर्यायी, गुत्ती, एवरी, बेळसांगवी, लाळी खुर्द, मंगरूळ, डोंगर कोणाळी, बोरगाव खुर्द, एकुरका खुर्द, करंजी, सोनवळा यांच्यासह गावातील स्वस्त धान्य दुकानदार संपावर गेले आहेत.